उंटीनीचे दुध भविष्यातील सुपर फूड बनणार असल्याचा दावा राजस्थान मधील बिकानेर येथील बिकानेर नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमेलचे संचालक नितीन पाटील ह्यांनी केला. गेल्या 10-15 वर्षांपासून उंटाच्या पर्यायी उपयुक्ततेबद्दल संशोधन सुरु आहे. याचा उद्देश लोकांनी उंटीनीच्या दुधाचा गाय- म्हशीच्या दुधाप्रमाणे वापर करावा हा आहे. काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर ‘हायवे ऑन माय प्लेट’ शो दाखविण्यात आला<br />होता. त्या वेळी उंटीनीच्या दुधापासून तयार केलेले आईस्क्रीम दाखविण्यात आले होते. 2006 मध्ये युनायटेड नेशन्स फूड अँड अॅगरीकल्चर ऑर्गनायझेशन उंटीनीच्या दुधाला उज्वल भविष्य असल्याचे सांगितले. उंटीनीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा तीन पट सी- व्हिटामिन असते, असेही नितीन पाटील ह्यांनी सांगितले<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
